Marathi News> भारत
Advertisement

Fastag वार्षिक पास काढल्यास तुम्हाला किती रुपयांचा फायदा? किंमतीत बायकोला घ्याल 2 नव्याकोऱ्या पैठणी!

Fastag Annual Pass: 3 हजार  रुपयांचा पास बनवून तुम्ही वर्षभर टोल प्लाझावरून जाऊ शकाल. 

Fastag वार्षिक पास काढल्यास तुम्हाला किती रुपयांचा फायदा? किंमतीत बायकोला घ्याल 2 नव्याकोऱ्या पैठणी!

Fastag Annual Pass: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वार्षिक टोल पासची घोषणा केली. ज्यामध्ये 3 हजार  रुपयांचा पास बनवून तुम्ही वर्षभर टोल प्लाझावरून जाऊ शकाल. या वार्षिक पासद्वारे तुम्हाला महामार्गावर वर्षाला 200 वेळा येजा करता येणार आहे. 

ही सुविधा कोणाला मिळेल?

केंद्रीय मंत्र्यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, हा पास विशेषतः केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी  म्हणजेच कार, जीप, व्हॅन इ.साठी डिझाइन करण्यात आला आहे आणि त्यामुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर सहज प्रवास शक्य होईल. वार्षिक पासचे नूतनीकरण करण्यासाठी लवकरच हायवे ट्रॅव्हल अॅप आणि एनएचएआय/एमओआरटीएच वेबसाइटवर एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया सोपी आणि सुरळीत होईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

टोल प्लाझावर नसणार गर्दी 

आम्ही एक नवीन प्रणाली आणणार आहोत, त्यानंतर वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता राहणार नाही, असेही  केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.टोल प्लाझावर वाहनांची सुरळीत हालचाल, 'ANPR-FASTag सर्वोत्तम बॅरियर-लेस टोलिंग सिस्टम' निवडक टोल प्लाझावर लागू केली जाईल जेणेकरून त्रासमुक्त हालचाल शक्य होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल, असे  एप्रिलच्या सुरुवातीला सरकारने म्हटले होते.

अॅडव्हान्स टोलिंग सिस्टम 'ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन' (ANPR) तंत्रज्ञानाचे संयोजन असेल, ज्यामध्ये नंबर प्लेटद्वारे वाहने ओळखली जातात आणि 'FASTag सिस्टम', जी रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) वर काम करते. या सिस्टम अंतर्गत, उच्च-कार्यक्षमता असलेल्या ANPR कॅमेरे आणि FASTag रीडरद्वारे वाहनांकडून टोल वसूल केला जाईल, ज्यामध्ये वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता राहणार नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

7 हजार रुपयांपर्यंत बचत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वार्षिक फास्टॅग पासद्वारे तुम्ही वर्षाला 7 हजार रुपयांपर्यंत कशी बचत करू शकता हे सांगितले. ते म्हणाले, वार्षिक टोल पास अंतर्गत तुम्हाला 200 फेऱ्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका फेऱ्याचा अर्थ एक टोल ओलांडणे असा होतो. उदाहरणार्थ जर तुम्ही टोलवर 50 रुपये देखील खर्च केले तर 200 फेऱ्यांसाठी तुम्हाला 10 हजार रुपये खर्च करावे लागतील. दुसरीकडे तुम्हाला फक्त 3 हजार रुपयांमध्ये वार्षिक पास दिला जात आहे. अशा प्रकारे, एक सामान्य माणूस 7 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकाल.

वार्षिक टोल पास फक्त राष्ट्रीय महामार्गांसाठी असून तो राज्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर लागू होणार नाही. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केंद्रीय मंत्र्यांच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार "एक ऐतिहासिक उपक्रम म्हणून 15 ऑगस्ट 2025 पासून 3 हजार रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येत आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 फेऱ्यांपर्यंत जे आधी असेल ते वैध असेल. म्हणजेच तुम्ही फक्त 15 रुपयांमध्ये एका टोलमधून जाऊ शकाल. 3 हजार रुपयांच्या या वार्षिक पासद्वारे तुम्ही 7000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

Read More