Marathi News> भारत
Advertisement

सासऱ्याकडून सुनेची नोकरी करते म्हणून हत्या

तिच्या चुलत सासऱ्याने १५ मार्च रोजी सकाळी, दिवसाढवळ्या हायवेवर तिची हत्या केली. 

सासऱ्याकडून सुनेची नोकरी करते म्हणून हत्या

अलवर : शाहजापूर भागातील बापुडा भागातील विवाहिता जी औद्यागिक क्षेत्रातील विकास ग्लोबल कंपनीत काम करत होती. तिच्या चुलत सासऱ्याने १५ मार्च रोजी सकाळी, दिवसाढवळ्या हायवेवर तिची हत्या केली. 

हत्येतील तलवार जप्त

या प्रकरणी पोलिसांनी आपोपी मामराज सिंहला कालेश्वर धाम पहाडातील तलहटी येथून आज सकाळी ताब्यात घेतलं. तसेच हत्येत वापरण्यात आलेली तलवार देखील ताब्यात घेतली. शाहजहांपूर पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

नोकरी करते याचा राग होता

असं म्हटलं जातं की, शाहजहाँपूर भागातील ३२ वर्षांची विवाहिता उषा, विकास ग्लोबल कंपनीत काम करत होती, यावरून तिच्या चुलत सासऱ्याने तिची हत्या केली.
ती नोकरी करत होती हे तिच्या चुलत सासऱ्याला सहन झालं नाही, याविषयी त्यांचा राग होता.

अखेर उषाची हत्या केली

आरोपी मामराज सिंह यांनी तिला याविषयी अनेकदा तिला नोकरी न करण्याविषयी सांगितलं होतं, पण ती ऐकत नव्हती, अखेर सासऱ्याने तिची भररस्त्यात दुपारी तलवारीने हत्या केली, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Read More