उत्तर प्रदेशातील आग्रामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुंदर सुनेच्या प्रेमात सासरा पडला त्यानंतर जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं. सुनेच्या एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या वडिलांनी स्वत:चा मुलाचा जीव घेतला आहे. नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात.
खरंतर, हे संपूर्ण प्रकरण जगदीशपुरा पोलीस स्टेशन परिसरातील लाडमडा गावातील आहे. गावातील रहिवासी चरण सिंग हा त्यांचा मुलगा पुष्पेंद्र सिंगसोबत राहत होता. त्यांचा मुलगा पुष्पेंद्रच्या लग्नानंतर त्यांचे वडील चरण सिंग त्यांच्या मुलाच्या पत्नीला म्हणजे सुनेच्या प्रेमात पडला. जेव्हा त्यांच्या मुलाला हे कळलं तेव्हा त्यांनी विरोध केला. या प्रकरणावरून मुलगा पुष्पेंद्र आपल्या वडिलांचे घर सोडून आपल्या पत्नीसोबत मथुरा इथे राहिला गेला. वडिलांना माहित होते की 14 मार्च रोजी होळीच्या दिवशी त्यांचा मुलगा त्यांच्या पत्नीसोबत होळी खेळण्यासाठी घरी येणार.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असा आरोप आहेत की, मुलगा आपल्या पत्नीसोबत होळी खेळण्यासाठी घरी आला होता, तेव्हा वडील चरण सिंग यांनी पुन्हा त्यांच्या सुनेशी गैरवर्तन केलं. यानंतर वडील चरण सिंग आणि मुलगा पुष्पेंद्र यांच्यात पुन्हा वाद झाला. संतप्त वडील चरण सिंग यांनी त्यांचा मुलगा पुष्पेंद्र यांच्या छातीत लोखंडी रॉडने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो छातीत जखमी झाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी वडिलांनी एक काडतूस काढला आणि मुलाच्या छातीत घातला, असा आरोप आहे. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी पोलिसांना सांगितलं की त्याने आत्महत्या केली आहे. तेव्हापासून पोलिसांनी या हत्येचे गूढ उकलण्यास सुरुवात केली. सुमारे चार महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांसमोर आलेले जे सत्य आलं ते सर्वांनाच चकित करून टाकलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासात असे उघड झाले की वडील चरण सिंग यांनी स्वतः त्यांचा मुलगा पुष्पेंद्र सिंग यांची हत्या केली होती. पोलिसांनी आरोपी वडील चरण सिंग यांना अटक केली असून त्यांची रवानगी तुंरुगात केली आहे.