Marathi News> भारत
Advertisement

रात्री-अपरात्री फोनवर बोलण्यावरून झापला; पत्नीने पतीचा private part कापला

राजस्थानच्या बाडमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. यामध्ये पती-पत्नीमधील भांडणाने इतकं भयानक रूप धारण केलं. 

रात्री-अपरात्री फोनवर बोलण्यावरून झापला; पत्नीने पतीचा private part कापला

बाडमेर : राजस्थानच्या बाडमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. यामध्ये पती-पत्नीमधील भांडणाने इतकं भयानक रूप धारण केलं. या भांडणात संतापलेल्या पत्नीने पतीचा थेट प्रायव्हेट पार्ट कापला आहे. बारमेर जिल्ह्यातील धोरिमान्नाच्या भालीसर गावातील ही घटना आहे. यावेळी पतीने आरोप केलाय की, पत्नीने ब्लेडच्या माध्यमातून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.

समोर आलेल्या माहितीनुसार, भालीसरमध्ये राहणाऱ्या तरुणाचं 6 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. दरम्यान लग्न झाल्यापासूनच या पती-पत्नीमध्ये वाद होता. पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो झोपला होता, मात्र त्यावेळी त्याची पत्नी फोनवर कोणाशी तरी बोलताना त्याला समजलं.

याच गोष्टीवरून पती-पत्नीमघ्ये वाद निर्माण झाला. या भांडणानंतर तो झोपाला. यानंतर पत्नीने झोपेत असताना ब्लेडच्या माध्यमातून पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. या घटनेनंतर पतीने आरडाओरडा केल्यावर कुटुंबातील इतर सदस्य खडबडून जागे झाले आणि त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं.

बाडमेरचे एएसपी रपतसिंग जैतावत यांनी सांगितलं की, पीडित तरुणा आटे साटे प्रथेने (ज्या घरात मुलगी दिली जाते, त्या बदल्यात त्याच घरची मुलगी पाठवली जाते.) लग्न झालं होतं. दरम्यान पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत भांडणं होतच राहायची.

मुख्य म्हणजे पहिल्यांदा पत्नीने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. तर दुसरीकडे, पत्नीने प्रायव्हेट पार्ट कापल्याचा आरोप करत पतीने गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलीस योग्य ती कारवाई चौकशी करून करण्यात येईल.

Read More