Marathi News> भारत
Advertisement

थकलेलं शरीर, हाडांचा सापळा, तरीही रुबाब! रणथंबोरच्या 'राणी'चा मृत्यूपूर्वीचा 'फायनल वॉक', Viral Video पाहून भावूक व्हाल

Ranthambore Tigress Arrowhead Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक थकलेली व कृष झालेली वाघिण चालताना दिसत आहे. नेमका काय आहे हा व्हिडिओ जाणून घेऊयात.

थकलेलं शरीर, हाडांचा सापळा, तरीही रुबाब! रणथंबोरच्या 'राणी'चा मृत्यूपूर्वीचा 'फायनल वॉक', Viral Video पाहून भावूक व्हाल

Ranthambore Tigress Arrowhead Video: रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील 'राणी' एरोहेड वाघिणीचा 19 जून रोजी मृत्यू झाला. एरोहेडच्या मृत्यूआधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर सचिन राय यांनी शेअर केला आहे. एरोहेड वाघिण प्रदीर्घ आजाराशी झुंज देत होती. या आजारामुळंच वयाच्या 14 व्या वर्षीच तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीचा रणथंबोरच्या राणीची रुबाबदार चाल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फोटोग्राफर सचिन राय यांनी म्हटलं आहे की, 17 जून रोजी पद्म तलावाजवळ एरोहेड शेवटची दिसली होती. याच तलावाजवळ तिने कित्येक वर्ष राज्य केले. 

भावूक करणारा व्हिडिओ

सचिन राय यांनी पुढे म्हटलं आहे की, 'तिला संघर्ष करताना पाहणे हे हृदयाला वेदना देणारे होते. सुरुवातीला चालताना ती धडपडली नंतर पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा उभं राहताना तिला त्रास होत होता. सुरुवातीची तिची पाऊल कमजोर पडत होती. एरोहेडला दहा पावलं चालणंदेखील मुश्कील झालं होतं. शेवटी ती एका झाडाजवळ पोहोचली आणि तिथे शांतपणे पहुडली. त्या शांततेत मला हे कळलं होतं की तिचा अंत जवळ आलाय.' 19 जून रोजी एरोहेड वाघीणीचा मृत्यू झाला. 

सचिन राय यांनी पुढे लिहलं आहे की, एरोहेडला तेव्हापासून पाहतोय जेव्हा ती एक बछडा होती. एरोहेडचा तिचा परिसर हा तिच्या आईपासून वारसा हक्काने मिळालेला आहे. तसंच, अनेक आव्हानात्मक परिस्थितीत तिने तिच्या बछड्यांचे पालनपोषण केले. पण एरोहेडची प्रतिस्पर्धीही तिची मुलगी रिद्धीच ठरली. रिद्धीने आई एरोहेडला तिच्याच अधिवासातून परतून लावले. एरोहेड ही जवळपास दीड वर्षांपासून बोन ट्युमरसारख्या आजाराने झुंजत होती.

एरोहेड ही रणथंबोरची प्रसिद्ध वाघिण मछली म्हणजेच T-16 ची नात होती. एरोहेडच्या आईचे नाव कृष्णा होते. एरोहेडचा जन्म 2014 रोजी झाला. तिच्या डाव्या गालावर विशिष्ट पद्धतीचा तीरचा आकार असल्याचे निशाण होते. त्यामुळं तिला एरोहेड असं नाव देण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून एरोहेड रणथंबोरमध्ये 2, 3, 4 आणि 5 या झोनमध्ये राज्य करत होती. अनेकदा तिला राजबाग तलाब आणि नलघाटी क्षेत्राच्या आसपास पाहिले गेले होते. एरोहेड वाघिणीची खासियत म्हणजे तिने काही महिन्यांपूर्वीच मगरीची शिकार केली होती. आजारी असतानाही तिने मगरीची शिकार करण्याचे धैर्य दाखवल्याने तिचीच चर्चा होत होती. याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. 

Read More