Marathi News> भारत
Advertisement

सनी लियॉनीविरुद्ध पोलीस तक्रार,पोर्नोग्राफीचा प्रचार केल्याचा आरोप

 सामाजिक कार्यकर्ता एमी एका एनोच मोसेने ही तक्रार दाखल केली आहे. 

 सनी लियॉनीविरुद्ध पोलीस तक्रार,पोर्नोग्राफीचा प्रचार केल्याचा आरोप

चेन्नई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लियॉनीविरुद्ध चेन्नईमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोर्नोग्राफी प्रमोट करण्याचा तिच्यावर आरोप आहे.

मीडिया रिपोर्टनुसार सामाजिक कार्यकर्ता एमी एका एनोच मोसेने ही तक्रार दाखल केली आहे. 

सनीमुळे संस्कृतीला धोका 

चेन्नईच्या नजपर्थ पोलीस स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सनी लियॉनी पोर्नोग्राफीचा प्रचार करत असून देशांतील कायद्याच्या विरोधात आहे.

यामूळे देशाच्या संस्कृतीला धोका पोहोचत असून समाजाचे नैतिक पतन होत असल्याचा आरोप एमी यांनी केला आहे. 

सनी 'वीरमादेवी' 

सनी लवरच तामिळ सिनेमा 'वीरमादेवी' मधून साऊथ इंडस्ट्रीमध्ये नवी सुरूवात करत आहे. हा सिनेमा ऐतिहासिक विषयावर आधारित आहे.

यामध्ये ती एका राजकुमारीच्या भुमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. 

Read More