Marathi News> भारत
Advertisement

जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार करणारा सीसीटीव्हीत कैद

घाबरलेल्या हल्लेखोरानं हत्यार घटनास्थळीच टाकत पळ काढला

जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार करणारा सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा (जेएनयू) विद्यार्थी उमर खालिद याच्यावर गोळीबार करणारा अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झालाय. विठ्ठलभाई पटेल रोडवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोराचा चेहरा दिसून येतोय. न्यूज एजन्सी एएनआयनं आरोपीचा एक फोटो जाहीर केलाय. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीनं सोमवारी संसद भवनाजवळच्या कॉन्स्टिट्युशन क्लबच्या बाहेर उमर खालिद याच्यावर हल्ला केला होता... परंतु, या हल्ल्यातून उमर खालिद बचावला.... गोळीचा आवाज झाल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या घाबरलेल्या हल्लेखोरानं हत्यार घटनास्थळीच टाकत पळ काढला. पोलिसांनी हे हत्यार जप्त केलंय. 

fallbacks
घटनास्थळी सापडलेलं हत्यार

आपण चहा पिण्यासाठी बाहेर पडलो असताना परिसरातून कुणीतही माझ्या मागच्या बाजूनं आलं... मला धक्का देऊन त्यानं खाली पाडलं... आणि माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला... पण, मी जीव वाचवत पळालो... त्यानंतर आरोपी तिथून फरार झालो... आरोपीचा चेहरा मात्र मी पाहू शकलो नाही, असं खालिदनं म्हटलंय. घटनास्थळी नेमकं काय झालं.... या हल्ल्यात किती जणांचा सहभाग होता, याविषयी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

देशात दहशतीचं वातावरण आहे... सरकारविरुद्ध तुम्ही जर काही बोललात तर तुमच्यावर एक शिक्का लावला जातो... त्यानंतर तुमच्यासोबत काहीही होऊ शकतं, असंही उमर खालिद यानं म्हटलंय. खालिद 'युनायटेड अगेन्स्ट हेट' संघटनेच्या 'खौफ से आजादी' नावाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होता. या कार्यक्रमात वकील प्रशांत भूषण, दिल्ली विश्वविद्यालयाचे प्रोफेसर अपूर्वानंद आणि हैदराबाद विश्वविद्यालयाचा दिवंगत विद्यार्थी रोहित वेमुला याची आई राधिका वेमुला यांसारखे वक्ते सहभागी झाले होते. 

Read More