Marathi News> भारत
Advertisement

अशी आहे मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाची पत्रिका

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लवकर विवाहबंधनात अडकणार आहे.

अशी आहे मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाची पत्रिका

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लवकर विवाहबंधनात अडकणार आहे. ईशाचं लग्न व्यावसायिक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलशी होणार आहे. ईशा आणि आनंद यांचं लग्न मुंबईतच होणार आहे. त्याआधी ईशा आणि आनंदच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ईशा अंबानीची लग्न पत्रिकेचे दोन हिस्से आहेत. पहिल्या बॉक्समध्ये ईशा आणि आनंद यांच्या नावाचं पहिलं अक्षर(ia) लिहिण्यात आलंय. तर दुसऱ्या बॉक्समध्ये आणखी ४ छोटे-छोटे बॉक्स आहेत. यामध्ये सरस्वतीचा फोटो लावण्यात आलाय.

ईशा अंबानीच्या या पत्रिकेला वेगवेगळ्या रंगांनी आणि फुलांनी सजवण्यात आलं आहे. ईशाच्या लग्नाची पहिली पत्रिका मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात ठेवण्यात आली होती. सिद्धीविनायकाचा आशिवार्द घेण्यासाठी मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि निता अंबानी स्वत: गेल्या होत्या.

ईशा आणि आनंद यांचा साखरपुडा २१ सप्टेंबरला इटलीमध्ये झाला होता. ३ दिवस हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, सोनम कपूर यासारखे अनेक सेलिब्रिटीज गेले होते. साखरपुड्यानंतर मुकेश अंबानींनी मुंबईमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं.

ईशा अंबानीच्या लग्नामध्ये गायक बियोंसे परफॉर्म करणार आहे. ईशा अंबानी बियोंसेची फॅन आहे. त्यामुळे मुकेश अंबानींनी बियोंसेला लग्नासाठी बोलावलं आहे.

आशियातल्या सगळ्यात पॉवरफूल १२ बिजनेस वूमनमध्ये ईशा अंबानीचा समावेश होतो. २०१५ मध्ये ईशा अंबानीचं नाव फोर्ब्स मासिकात सगळ्यात लहान वयातली दुसरी अरबपती म्हणून आलं होतं. २०१८ साली फोर्ब्सनं उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत ईशा दुसऱ्या क्रमांकावर होती. ईशा अंबानीची प्रत्येक वर्षाची कमाई ४७१० कोटी रुपये आहे. 

Read More