Marathi News> भारत
Advertisement

शपथविधी सोहळ्याला दांडी; नवनिर्वाचित खासदार विवाहबंधनात

संसदेच्या पहिल्याच दिवशी वेशभूषेच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. 

शपथविधी सोहळ्याला दांडी; नवनिर्वाचित खासदार विवाहबंधनात

मुंबई : अभिनय़ाकडून राजकारणाकडे वळलेल्या नुसरत जहाँ यांनी लग्नगाठ बांधत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बुधवारी टर्की येथे पार पडलेल्या एका विवाहसोळ्यात त्यांनी निखिल जैन या व्यावसायिकाशी लग्नगाठ बांधली. ज्यानंतर गुरुवारी खुद्द नुसरत यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नसोहळ्याविषयीची माहिती दिली. 

'कायमस्वरुपी एका आनंददायी प्रवासाच्या दिशेने......', असं लिहित त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये निखिल जैनच्या नावाचा उल्लेख केला. त्यांनी पोस्ट केलेला फोटो पाहता एका सुरेख आणि तितक्याच नयनरम्य ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडल्याचं लक्षात येत आहे. 

लग्नाच्या वेळी नुसरत यांनी पारंपरिक असा गडद लाल रंगाचा लेहंगा गातला होता. तर, शेरवानी आणि फेट्यामध्ये निखिलही त्यांना शोभून दिसत होता. बोड्रम येथे हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी मित्रपरिवार आणि कुटुंबाचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. 

 
 
 
 

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

नुसरत यांनी काही दिवसांपूर्वीच तिच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पश्चिम बंगाल येथून त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर बसिरहाट येथून निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिलवला होता. पण, लग्नसोहळ्याच्या कारणाने नुसरत यांना खासदारकीची शपथ मात्र घेता आली नाही. मोठ्या दिमाखात विवाहबंधनात अडकल्यानंतर आता नुसरत आणि निखिल त्यांच्या मित्रपरिवारासाठी एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत. 

 

Read More