Marathi News> भारत
Advertisement

ममता बॅनर्जींना मोठा झटका, TMC च्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मोठा झटका 

ममता बॅनर्जींना मोठा झटका, TMC च्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच ममता बॅनर्जी यांना सोडून जाणाऱ्या नेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी तृणमूल काँग्रेस (TMC) च्या ५ नेत्यांनी दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. 

भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये आमदार राजीव बॅनर्जी (Rajib Banerjee), वैशाली डालमिया (Vaishali Dalmiya) आणि प्रबीर घोषाल (Prabir Ghoshal), हावडाचे माजी निगम अध्यक्ष रथीन चक्रबर्ती (Rathin Chakraborty) आणि अभिनेता रुद्रानिल घोष (Rudranil Ghosh) या नेत्यांसोबत भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्यासोबत अमित शाह यांच्याकडे पोहोचले. 

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पाच नेत्यांनी सांगितलं की,'बंगालमध्ये यावेळी खूप अत्याचार होत आहे. तिकडची जनता TMC ला हैराण झाले आहेत. बंगालच्या विकासासाठी आता भाजप काम करत आहे. बांगलादेशच्या प्रगतीकरता भाजप कार्यशील आहे.'

 गृहमंत्री अमित शाह ३० आणि ३१ जानेवारी रोजी पश्चिम बंगालचा दौरा करायचा होता. या दरम्यान तृणमूल काँग्रेस सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा देणारा राजीव बॅनर्जी यांच्यासह पाच नेत्यांनी भाजपध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रम ठरला होता. मात्र, दिल्लीत बॉम्ब ब्लास्ट आणि शेतकरी आंदोलनाला पाहता गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा अचानक रद्द झाला.  

Read More