Mob Burn 5 Of Family Alive: बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक दृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यात असलेल्या राजीगंज पंचायतीतील टेटगामा आदिवासी पाड्यावर पेट्रोल ओतून एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना जिवंत जाळण्यात आले. मृतांमध्ये काटो देवी, त्यांचे जावई बाबूलाल उरांव , सीता देवी , मंजित कुमार आणि राणी देवी यांचा समावेश आहे. या हत्येमागील कारणांचा पोलिस सर्व बाजूंनी या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली. एका आदिवासी कुटुंबातील पाच जणांची चेटकीण असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रामदेव उराव याच्या मुलाचा मृत्यू काळी जादूमुळं झाला आणि दुसऱ्या मुलाची त्यामुळंच तब्येत बिघडली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी गावातीलच एका कुटुंबाला निशाणा बनवत चेटकीण असल्याचा आरोप करत त्यांना जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. बाबूलाल उरांव , सीता देवी , मंजित कुमार आणि राणी देवी आणि तपतो मोसमत यांना गावातील लोकांनीच मारहाण केली आणि जिवंत जाळले. सर्व मयत एकाच कुटुंबातील होते. या घटनेनंतर गावात भितीचे वातावरण पसरले आहे अनेक लोक घर सोडून निघून गेले आहेत. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच लगेचच घटनास्थळी धाव घेतली असून डॉग स्कॉड आणि एसएसएलल टीमसोबत तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नकुल कुमारला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर जमावाला भडकावण्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेबाबत पीडित कुटुंबाचा एकुलता एक वारस ललित कुमार याने म्हटलं आहे की, संपूर्ण कुटुंबाला चेटकीण असल्याचे सांगून जिवंत जाळले. हत्येनंतर मृतदेहांवर पाणी फेकण्यात आले. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण काळी जादू आणि तंत्र मंत्र याच्याशी संबंधित आहे. पाच जणांचे मृतदेह तलावातून काढण्यात आले असून सर्व जळालेल्या अवस्थेत आहेत. या घटनेचा साक्षीदार असलेल्या मुलाने सांगितले की या घटनेत सर्व गाव सामील आहे. सध्या पूर्ण रिकामं करण्यात आलं आहे. सध्या बचावलेला मुलगा मानसिक धक्क्यात असून त्याच्याकडून अधिक माहिती काही दिवसांनी घेण्यात येईल, अशी माहिती पोलीसांनी दिली.