Marathi News> भारत
Advertisement

Flipkart Big Billion Days | आयफोन 12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी; जबरदस्त डिस्काउंट

फ्लिपकार्टच्या बिग बिलीअन डेस सेलमध्ये आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी स्वस्त किंमतीत मिळणार आहे. 

Flipkart Big Billion Days | आयफोन 12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी; जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली : जर तुम्ही सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या खिशात ऍपलचा कोणताही नवीन स्मार्टफोन ठेऊ इच्छिता तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. फ्लिपकार्टच्या बिग बिलीअन डेस सेलमध्ये आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी स्वस्त किंमतीत मिळणार आहे. फ्लिपकार्ट या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून तुम्ही आयफोन खरेदी करू शकता. 

फ्लिपकार्टच्या बिग बिलीअन डेस सेलमध्ये आयफोन आणि आयफोन 12 मिनीची किंमत 40 हजार 999 रुपये आहे. तर आयफोन 12 ची सुरूवाती किंमत 52 हजार 999 रुपये आहे. दोन्ही मॉडेल 64 जीबी वेरिएंटचे आहेत.

या स्वस्त किंमतींऐवजी तुम्ही 15 हजार 800 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर घेऊन आणखी किंमत कमी करू शकता. ICICI Bank आणि  Axis Bank च्या माध्यमातून 10 टक्के इंस्टंट ऑफर देखील मिळणार आहे. याशिवाय निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला नो कॉस्ट EMIचा पर्याय देखील मिळेल.

स्पेसिफिकेशन्स
ऍपल आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनीचे स्पेशिफिकेशन्स साधारण एकसारखे आहेत. परंतु सर्वाधिक फरक स्क्रीनच्या साइजचा आहे.  स्टॅडर्ड मॉडेलमध्ये 6.1 इंचाची स्क्रीन आहे. तर मिनी मॉडेलमध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले आहे. दोन्हीमध्ये OLED पॅनल आहे. दोन्ही डिवाइस मॅगसेफ वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करातत. दोन्हींमध्ये एक युएसबी - टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे.

Read More