Marathi News> भारत
Advertisement

राजस्थानमध्ये थैमान! महापूरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर; लष्कराला केलं पाचाराण

 राजस्थानमध्ये हडौती अंचलमध्ये महापूरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. राज्य सरकारने परिस्थितीशी सामना करण्यासाठी लष्कराची मदत मागितली आहे.

राजस्थानमध्ये थैमान! महापूरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर; लष्कराला केलं पाचाराण

कोटा : राजस्थानमध्ये हडौती अंचलमध्ये महापूरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. राज्य सरकारने परिस्थितीशी सामना करण्यासाठी लष्कराची मदत मागितली आहे. शुक्रवारी उशीरा रात्री लष्करी जवानांची एक तुकडी कोटा पोहचली. यासोबतच लष्कराने आपत्ती निवारणाचे काम आपल्या हातात घेतले. लष्कराने सर्वात आधी डोडिया मोहल्ल्यात अडकलेल्या 20 हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढले. 

राज्यातील कोट, बारा, बूंदी आणि झालावाड जिल्ह्यांमध्ये मागील 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. क्षेत्रातील नद्या दुथडीच्या बाहेर वाहत आहेत. अशा परिस्थितीत महापूरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ लष्काराची मदत घेण्याचा निर्णय घेतला. कोटा जिल्ह्याचे कलेक्टर उज्वल राठोड यांच्या रिपोर्ट नंतर 100 पेक्षा जास्त लष्करी जवानांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काम केले. जिल्हा प्रशासनाने जेथे जेथे लोकं अडकली आहेत. तेथील लोकेशन जवानांना सांगून लोकांना वाचवण्याचे काम केले.
 
महापूरामुळे वीज बंद
 मुसळधार पावसामुळे इलेक्ट्रिक सेवा कोलमडली आहे. लोकांची घरे पाण्याखाली आहेत. अनेक लोकांना उंचावर आसरा घेतला आहे. तर अनेकजण जवानांच्या मदतीची वाट पाहत आहेत.

 

Read More