Marathi News> भारत
Advertisement

प्रकृती बिघडल्याने हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह रुग्णालयात दाखल

छातीत अचानक दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल 

प्रकृती बिघडल्याने हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह रुग्णालयात दाखल

शिमला : हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वीरभद्र सिंह यांची प्रकृती आता स्थिर आहे असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

"वीरभद्र सिंह यांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या काही टेस्ट केल्या जात आहे." असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. वीरभद्र सिंह यांना शनिवारीच डिस्चार्ज मिळाला होता. पण काही वेळानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

वीरभद्र सिंह यांचं वय 84 वर्ष आहे. मागील आठवड्यात ते विधानसभेच्या कामकाजात देखील सहभागी झाले होते. या आधी त्यांच्यावर 2 वेळा हृद्यविकाराची शस्त्रक्रिया झाली आहे. वीरभद्र सिंह दिल्लीसाठी रवाना होत असतांना शनिवारी रस्त्यातच त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Read More