Marathi News> भारत
Advertisement

डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालयाकडून महत्त्वाची माहिती

त्यांच्या प्रकृतीविषयी .... 

डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालयाकडून महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते Dr Manmohan Singh डॉ. मनमोहन सिंग यांना रविवारी रात्री नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्तेतीत अचान झालेला बिघात आणि छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली गेली. 

सध्याच्या घडीला रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्याअंतर्गत आता सिंग उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे. 

रुग्णालयाशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपचार पद्धतीला ते चांगला प्रतिसाद देत आहेत. सोबतच आता या आधारे त्यांच्यावर पुढील उपचारही करण्यात येणार आहेत. सध्या त्यांना डॉक्टरांनी निरिक्षणाअंतर्गत ठेवलं आहे, असंही रुग्णालयाकडून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

देशाचं पंतप्रधानपद भूषवणारे सिंग हे सध्या राजस्थानच्या वतीने राज्यसभेचे सदस्य आहेत. डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे १३ वे पंतप्रधान आहेत. ज्यांचा कार्यकाल हा २००४ ते २०१४ इतका राहिला आहे. शिवाय ते एक प्रख्यात अर्थतज्ज्ञही आहेत. या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नर पदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती. 

 

Read More