Marathi News> भारत
Advertisement

Mulayam Singh Yadav Last Rites : मुलायम सिंह यादव अनंतात विलिन

मुलायमसिंह यादव यांच्यावर (Mulayam Singh Yadav इटावा येथील सैफई येथील मेला मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Mulayam Singh Yadav Last Rites : मुलायम सिंह यादव अनंतात विलिन

लखनऊ : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) पंचतत्त्वात विलीन झाले आहेत. इटावा येथील सैफई येथील मेला मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलायम यांचे पुत्र आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मुखाग्नी दिली. (former uttar pradesh cm samajwadi party leader mulayam singh yadav last rites)

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या अंत्यसंस्कारासाठी असंख्य लोकं जमलेले. मुलायमसिंह यादव यांचं सोमवारी वयाच्या 82 व्या वर्षी गुरुग्राममधील खासगी मेदांता रुग्णालयात निधन झालं. सोमवारी संध्याकाळी त्यांचे पार्थिव सैफई येथे आणण्यात आले हजारो लोक 'नेताजींना' अंत्यदर्शनासाठी पोहोचले. मुलायम हे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये 'नेताजी' म्हणून प्रसिद्ध होते. दरम्यान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, संसदीय कामकाज मंत्री सुरेश खन्ना आणि राज्य सरकारचे अनेक मंत्री श्रद्धांजली वाहण्यासाठी सैफई येथे पोहोचले.

मुलायम सिंह यादव यांची राजकीय कारकिर्द

मुलायम सिंह यादव यांचा 22 नोव्हेंबर 1939 रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता. ते 10 वेळा आमदार होते आणि तब्बल 7 वेळा खासदार म्हणूनही निवडून आले. तसेच ते 3 वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी 1996 ते 98 पर्यंत देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली होती. एकेकाळी त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणूनही पाहिलं जात होते. मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे 2012 ते 2017 पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत.

Read More