Marathi News> भारत
Advertisement

दलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद

एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय. 

दलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद

भोपाळ : एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय. 

हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

२ एप्रिल रोजी दलितांच्या आंदोलना दरम्यान ग्वालियर, भिंड आणि मुरैना जिल्ह्यात झालेल्या हिंसक घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारनं यावेळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा १० एप्रिल रोजी १२ वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 

दिवसभर कर्फ्यु राहणार

सोमवारी मध्यप्रदेश सरकारमध्ये गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली. सोबतच भिंडमध्ये सोमवारी रात्रीपासून संपूर्ण दिवसभर कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ग्वालियरमध्ये इंटरनेट सेवा रविवारी रात्री ११ वाजल्यापासून मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत बंद राहतील. मुरैनामध्ये सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील.

२ एप्रिल रोजी झालेल्या हिंसा प्रकरणात केवळ मुरैनामध्ये आत्तापर्यंत ६१ जणांना अटक करण्यात आलीय. तर ८०० लोकांविरोधात गुन्हे दाखल 

Read More