Marathi News> भारत
Advertisement

अरेरे! ही कसली स्वागत करण्याची पद्धत... शांत बसलेल्या तरुणासोबत मित्रांनी काय केलं पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज आपल्याला काही ना काही मजेदार पाहायला मिळतं. येथे दररोज हजारो लाखो व्हिडीओ पाहिले आणि अपलोड केले जातात.

अरेरे! ही कसली स्वागत करण्याची पद्धत... शांत बसलेल्या तरुणासोबत मित्रांनी काय केलं पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर दररोज आपल्याला काही ना काही मजेदार पाहायला मिळतं. येथे दररोज हजारो लाखो व्हिडीओ पाहिले आणि अपलोड केले जातात. पण असे काही व्हिडीओ आहेत जे समोर येताच सोशल मीडिया यूजर्स त्याला सारखे सारखे पाहतात आणि आपल्या मित्रांसोबत देखील ते शेअर करतात. काही हौशी मंडळी तर प्रसिद्धीसाठी काही मजेदार व्हिडीओ बनवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामधील कंटेन्ट हा आश्चर्यकारक, मनोरंजक आणि धक्कादाय आहे. या तिन्ही गोष्टी व्हिडीओमध्ये असल्याने व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये या तरुणासोबत जे घडतं ते पाहून तुम्ही काही वेळेसाठी तुमचा श्वास रोखून धराल परंतु नंतर मात्र तुम्हाला तो व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल आणि तुम्ही त्याला आठवून पोट धरून हसाल.

काही सेकंदांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने आपल्या मित्रांना घरी पार्टीसाठी आमंत्रित केले आहे.  पण नंतर त्यांनी नवीन आलेल्या मित्रासोबत मजा करण्याचा प्लॅन केला. सर्व मित्र एका मोठ्या खोलीत आरामात बसलेले दिसतात. तेवढ्यात शेवटी येणारा मित्र आत आला आणि त्याला सोफ्यावर बसायला सांगितले गेले.

मजेदार व्हिडिओमध्ये ती व्यक्ती सोफ्यावर बसल्याचे दिसून येते. पण काही क्षणातच तो हवेत कित्येक फूट उडून जोरात हवेत उडतो आणि जमिनीवर पडतो. या दरम्यान अनेक मित्र वाईट रीतीने हसतात तर काही त्याला उचलण्यासाठी धावतात. हे सगळं घडत असताना सुरूवातीला काय घडतंय हे तुम्हाला कळणार नाही परंतु पुन्हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळं तुमच्या लक्षात येईल.

ट्विटरवर @AwardsDarwin या हँडलने हा मजेदार व्हिडीओ देखील शेअर केला आहे,  नेटकऱ्यांनी या व्हिडीओ पाहून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read More