Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक ! युवतीवर ४ दिवस ४० जणांचा अत्याचार

तिला खाण्यामध्ये नशेचे पदार्थ दिले जातं त्यानंतर ९ ते १० जण तिच्यावर सामुहिक बलात्कार करत. 

धक्कादायक ! युवतीवर ४ दिवस ४० जणांचा अत्याचार

पंचकूला : मोरनी येथील लवली गेस्ट हाऊसमध्ये २२ वर्षीय युवतीवर सलग चार दिवस ४० जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलायं. तिला खाण्यामध्ये नशेचे पदार्थ दिले जातं त्यानंतर ९ ते १० जण तिच्यावर सामुहिक बलात्कार करत. युवतीने तिथून पळ काढून आपल्या पतीला सर्व कहाणी सांगितल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. युवती बसने पंचकूल पोहोचली. पतीने तिला पोलीस स्थानकात नेले पण पोलिसांनी तिला मनीमाजरा येथे पाठवलं. चंदीगढ पोलिसांनी तक्रार दाखल करत लवली रिसॉर्ट मालक आणि मॅनेजरला ताब्यात घेत न्यायालयीन कोठडीत पाठविले.

फोनवर रडायची 

 सुनील सन्नी याने यारपुररानी येथे कामासाठी एका महिलेची गरज असल्याचे सांगितले. मनीमाजरा येथे राहणाऱ्या पिडितेच्या पतीने तिला तिथे कामावर पाठवले.१५ जुलैला त्याने पत्नीला रामगढला सोडले त्यानंतर हॉटेल मालताने कारमध्ये बसवून तिला फार्म हाऊसला नेले. तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करु असे सुनीलने सांगितले होते पण फार्म हाऊस नेण्याऐवजी सुनीलने तिला मोरनीस्थित लवली गेस्ट हाऊसला नेले. त्यानंतर पती जेव्हा फोन करायचा तेव्हा ती रडायची पण घाबरल्याने काही बोलू शकत नव्हती. 

पोलिसवाले असल्याचे सांगत अत्याचार

पतीने सुनीलला संपर्क केला पण तो सारखा फोन कट करत असे. त्यानंतर सुनीलने त्याचा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. पत्नीला परत पाठविण्यास सांगितल्यावर सुनील त्याला धमकी देऊ लागला. आरोपी पिडितेला नशेचे इंजेक्शन देण्याची धमकी देत असतं. तिच्या खाण्यामध्ये नशेचे पदार्थ टाकत. १५ ते १८ जुलै दरम्यान रोज वेगवेगळ्या लोकांनी तिच्यावर अत्याचार केले. तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता आम्ही पोलिसवाले आहोत असे तिला धमकावले जायचे. कधी १० तर कधी ११ जण सामुहिक अत्याचार करत असल्याचे पिडितिने पोलिसांना सांगतिले.

Read More