Marathi News> भारत
Advertisement

लीक होणाऱ्या सिलेंडरचा रेग्युलेटर ऑफ करताना किचनमधून आग अन्...; थरार CCTV त कैद! दोघेही कसे वाचले पाहा

Gas Cylinder Explosion CCTV: संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून या दोघांसोबत काय घडलं याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

लीक होणाऱ्या सिलेंडरचा रेग्युलेटर ऑफ करताना किचनमधून आग अन्...; थरार CCTV त कैद! दोघेही कसे वाचले पाहा

Gas Cylinder Explosion CCTV: घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या किंवा ऐकल्या असतील. सामान्यपणे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास घरात असलेल्या व्यक्तीला जिविताचा धोका संभावतो. गॅस सिलेंडरच्या स्फोटात लोक मृत्यूमुखी पडल्याच्या बातम्याही वेळोवेळी समोर येत असतात. मात्र सध्या इंटरनेटवर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये घरात गॅस सिलेंडरमधून गॅस लिक होत असताना नेमकं काय घडलं हे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं आहे. 

काय व्हिडीओत आहे काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये आधी किचनमध्ये फ्रिजच्या समोर नळीमधून गॅस बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. गॅस लिक होत असल्याची कल्पना असल्याने एक महिला घराच्या दारातूनच हा प्रकार पाहताना दिसते. मात्र गॅस लिक होण्याचं थांबलं आहे असं वाटून ती आतमध्ये येते. तर दुसऱ्या बाजूने एक पुरुष गॅसच्या टाकीपर्यंत येतो. त्यानंतर हे दोघे गॅस सिलेंडर उचलण्याचा प्रयत्न करतात. इतक्यात मागे असलेल्या दारातून अचानक गॅसच्या माध्यमातून आग पसरते आणि सिलेंडरचा स्फोट होतो.

गॅस सिलेंडर उचलायला येतात अन्...

व्हिडीओमध्ये काही क्षण धूर दिसल्यानंतर आग लागलेल्या अवस्थेत सिलेंडर पडलेला दिसतो आणि ही महिला पळत ज्या दारातून आत आली तिथून बाहेर पळताना दिसते. साडी आणि पदर झटकत झटकत ती आपल्या साडीने आग तर पकडली नाही ना याची खात्री करतच दारातून बाहेर पडते. दुसरीकडे तो पुरुष डाव्या बाजूच्या दारातून बाहेर पडतो. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओत दिसणारी महिला आणि पुरुष दोघेही सुरक्षित असून अगदी थोडक्यात ते बचावले आहेत. नेमकं घडलं काय तुम्हीच पाहा...

स्फोटानंतरही दोघे वाचले कसे?

महिला आणि पुरुष गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करण्यासाठी त्याच्या जवळ गेले. मात्र अचानक स्फोट झाला. मात्र तरीही ते दोघे बचावले कसे? असा प्रश्न विचारला जात असतानाच यामागील कारण ठरलं घराच्या खिडक्या आणि दरवाजा उघडा असणं. खिडक्या-दरवाजे उघडे असल्याने गॅस पसरला, बराचसा गॅस घराबाहेर गेला आणि एका जागी साठून राहिला नाही. याच कारणामुळे स्फोटानंतरही जास्त आग पकडली नाही आणि या दोघांनाही पळून जाण्याची संधी मिळाली. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. 

Read More