Marathi News> भारत
Advertisement

Trending Quiz : दिल्ली, न्यू दिल्ली आणि NCR मध्ये काय आहे फरक तुम्हाला माहितीये?

General Knowledge :  तुम्हालाही कधी पडलाय का दिल्ली, न्यू दिल्ली आणि NCR च्या नावावरून प्रश्न?

Trending Quiz : दिल्ली, न्यू दिल्ली आणि NCR मध्ये काय आहे फरक तुम्हाला माहितीये?

General Knowledge : आपल्याला आपलं राज्य आपला देश याविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं किती महत्त्वाचं आहे हे जाणवत नाही. पण आपण राहतो किंवा त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या गोष्टींविषयी माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. अशात फक्त तेच राहत नाही तर त्यासोबत आजुबाजूच्या सगळ्या घडामोडी या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या सगळ्याला एकूण काही बोलायचं झालं तर त्याला सामान्य ज्ञान असं म्हणतात. सामान्य ज्ञान अर्थात त्याच्या आजुबाजूला घडणाऱ्याच गोष्टी नसतात तर त्यासोबत गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि इतर अनेक विषयांवरील प्रश्न असतात. 

आता सामान्य ज्ञान हे फक्त स्पर्धा परिक्षा किंवा IAS-IPS ची तयारी करणाऱ्यांसाठीच नाही आहे. तर सहज आपल्याला आपल्या सभोवतालच्या गोष्टी माहित असणं महत्त्वाचं आहे. अशात सध्या एक विषय चांगलाच चर्चेत आहे तो म्हणजे ट्रेंडिग क्वीझ... क्वीझ असे आहेत की सगळ्यांना तो खेळ खेळायला प्रचंड आवडतो. क्वीझ म्हटलं की त्यासाठी फक्त एक पर्याय निवडायचा असतो किंवा एका शब्दात सांगायचं असतं. आज आपण आपल्या देशाची राजधानी दिल्लीविषयी जाणून घेणार आहोत. कारण दिल्ली आणि त्याच्या सभोवतालच्या काही नावांवरून नेमकं दिल्ली कोणतं आहे हे अनेकांना कळत नाही. 

तुम्हाला माहित आहे का की दिल्ली, नवी दिल्ली आणि NCR मध्ये काय फरक आहे? तर दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. यात 11 जिल्हे आहेत. तर नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तिसरा भाग अर्थात NCR म्हणजे नॅशनल कॅपिटल रीजन (National Capital Region). यामध्ये 24 जिल्हे आहेत. यात हरियाणाचे 14 जिल्हे, उत्तर प्रदेशचे 8 जिल्हे आणि राजस्थानचे 2 जिल्हे आहेत. 

हेही वाचा : 'छावा' चित्रपटातील ‘लेझीम’ वर आक्षेप नको घ्यायला होता! नेमकं काय म्हणाला संतोष जुवेकर?

आता या तिन्ही शहरांमध्ये काय फरक आहे त्याविषयी नक्कीच तुम्हाला कळलं असेल. कारण आजवर अनेकांना यात काय फरक आहे तो कळत नव्हता. अनेकांना वाटायचं की हे तिन्ही ठिकाणं एकच आहेत. त्यांना फक्त वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत. पण तसं नसून ते तीन वेगळे शहर आहेत. 

Read More