Marathi News> भारत
Advertisement

'गिनिज बूक'मध्ये राजकोटच्या महिलांचा तलवार डान्सचा रेकॉर्ड

गुजरातच्या राजकोटमध्ये 2 हजार महिलांनी तलवार डान्स केला आहे. हा तलवार डान्स गिनिज 

'गिनिज बूक'मध्ये राजकोटच्या महिलांचा तलवार डान्सचा रेकॉर्ड

राजकोट : गुजरातच्या राजकोटमध्ये 1 हजार पेक्षा जास्त महिलांनी तलवार डान्स केला आहे. हा तलवार डान्स गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. गुजरातच्या राजकोटला नवा राजा मिळाला आहे. राजकोट राजघराण्याचे मनधाता सिंहजी जडेजा आता राजकोटचे नवे राजे असणार आहेत. राजे जडेजा यांची आज ताजपोशी करण्यात आली. पण मागील तीन दिवसांपासून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात राजकोटमध्ये सुरू आहे. 

तलवार डान्स म्हणजेच तलवार रास हा याच कार्यक्रमाचा एक भाग आहे. ज्यात 1 हजार पुरूष आणि 1 हजारपेक्षा जास्त महिलांनी भाग घेतल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी महिलांनी शिस्तबद्ध कोणताही गोंधळ होवू न देता हातात तलवार घेऊन तलवार डान्स केला आहे.

Read More