Marathi News> भारत
Advertisement

पैशांसाठी मुलीला करायला लावलं हे कृत्य, Video मन सुन्न करणारा !

तिची व्हिडिओतील परिस्थिती बघता अनेकांचे डोळे पाणावले आहेत. 

पैशांसाठी मुलीला करायला लावलं हे कृत्य, Video मन सुन्न करणारा !

Little girl eating chilli : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ विनोदी असतात, तर काही व्हिडिओ डोळ्यात पाणी आणतात. असाच काहीसा एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे अनेकांना तिच्यासाठी वाईट वाटत आहे. तिची व्हिडिओतील परिस्थिती बघता अनेकांचे डोळे पाणावले आहेत. 

एखाद्याच्या परिस्थितीचा असा फायदा घेणं कितपत योग्य आहे, असा सवाल देखील या व्हिडिओमुळे विचारला जात आहे. रस्त्यावर बसलेल्या या चिमुकलीने काही पैशांसाठी जे केलंय ते खरंच मनं हेलावणारं आहे.

अनेकांना लहान मुलं पाहिली की त्यांचे लाड करावेसे  वाटतात. त्यांनी  चॉकलेट, आईसस्क्रीम किंवा गोड पदार्थ खायला द्यावेसे वाटतात. पण समोर आलेल्या या  व्हिडीओमध्ये एका अज्ञात व्यक्तीने चिमुकलीच्या हातात चक्क मिरची दिली आहे. आणि ही चिमुकली ती मिरची हसत हसत खाताना दिसत आहे. 

मिरची चावताच तिच्या तोंडात जळजळ होते, चेहरा लालबुंद होतो असं असताना ही मुलगी मात्र हसत हसत मिरची खाते. एखाद्याने मिरची चावताच त्याची प्रतिक्रिया कशी असेल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ही एवढीशी मुलगी मात्र मिरची खाल्ल्यानंतर हसताना दिसते आहे. पण तिला ही मिरची शिक्षा म्हणून नाही तर गरजेपोटी खावी लागते आहे.

या मुलीचं मिरची खाण्याचं कारण ऐकून तुमचं मन सुन्न होईल. फक्त काही पैशांसाठी तिच्यावर मिरची खाण्याची वेळ ओढावली. अखेर मिरची खाऊन दाखवल्यानंतर तिला पैसे देण्यात आले. हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर हसत हसत मिरची खाणाऱ्या या मुलीला पासून तुमचे डोळे देखील पाणावतील. 

Read More