Marathi News> भारत
Advertisement

त्या सहा जणांशी ती एकटी लढली आणि ठरली सर्वांसाठी प्रेरणा... पाहा व्हिडीओ

इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक धाडसी मुलगी तिला त्रास देणार्‍या आणि धमक्या देणार्‍या 6 मुलांना मारहाण करताना दिसत आहे.

त्या सहा जणांशी ती एकटी लढली आणि ठरली सर्वांसाठी प्रेरणा... पाहा व्हिडीओ

मुंबई : जगभरातील लाखो स्त्रिया दररोज लैंगिक छळासाठी बळी पडतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महिलांना अनेकदा सराव करण्यास आणि स्वसंरक्षणाचे वर्ग घेण्यास सांगितले जाते. तथापि, आजकाल मुली खूप हुशार झाल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या मार्गाने अडचणीतून कसे बाहेर पडायचे हे माहित आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुले एका मुलीला चारही बाजूंनी घेरतात आणि तिला त्रास देऊ लागतात. मात्र यावेळी मुलीने या सर्वांनाच चांगला धडा शिकवला आहे.

इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक धाडसी मुलगी तिला त्रास देणार्‍या आणि धमक्या देणार्‍या 6 मुलांना मारहाण करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये 6 लोक एका सुनसान रस्त्यावर एका मुलीला घेरून त्रास देताना दिसत आहेत. व्हिडीओचे ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही.

परंतु या व्हिडीओमध्ये तर तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी कशी मुलांशी भांडत आहे आणि मार्शल आर्ट्सच्या हालचालींसह फ्लाइंग किकसह त्यांना जमिनीवर पाडते.

या मुलीने सर्व ६ मुलांना एक एक करून पायाने लाथ मारून खाली पाडले. 25 सेकंदांचा हा व्हिडीओ 'द फिगेन' अकाउंटने ट्विटरवर या कॅप्शनसह पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मुलीशी कधीही पंगा घेऊ नका!' व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत 35 लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि 9000 हून अधिक वेळा शेअर केले गेले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचा अंदाज या व्हिडीओवरून लावू शकता.

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून असंतोष व्यक्त केला आहे, तर अनेकांनी मुलीच्या अशा वागण्याचे कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले की, 'कोणत्याही मुलाला असा संघर्ष करण्याची वेळ येऊ नये.

Read More