Marathi News> भारत
Advertisement

'कर्म करायला गेली अन्...', पावसात भिजणाऱ्या माकडाला छत्री दिली पण पुढे वेगळचं घडलं

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच एका माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. 

'कर्म करायला गेली अन्...', पावसात भिजणाऱ्या माकडाला छत्री दिली पण पुढे वेगळचं घडलं

Viral Video : दररोज सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही मजेशीर तर काही गंभीर असतात. अनेकदा प्राणी आणि पक्षाचे सुंदर असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर माकडाचा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ एखाद्या पर्यटन स्थळावरील वाटत आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक मुलगी घाटातील रोडच्या शेजारी असणाऱ्या कड्यावर बसलेल्या एका माकडाला मदत करताना दिसत आहे. 

दरम्यान, अनेकदा पर्यटक हे पर्यटनस्थळी गेल्यानंतर तिथे असणाऱ्या माकडाना किंवा इतर कोणत्याही प्राण्यांना खाण्याचे पदार्थ देत असतात. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. या व्हिडीओनंतर अनेक पर्यटन ठिकाणी प्राण्यांना खायला देऊ नका अशा सूचना देखील वारंवार दिल्या जातात. तसेच मोठ्या अक्षरात फलक देखील लावले जातात. 

मात्र, सध्या सोशल मीडियावर एका अशाच व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये एक माकड हे घाटातील रस्त्याच्या कड्यावर बसलेले दिसत आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. अशावेळी माणसांप्रमाणे प्राणी देखील पावसाचा आनंद घेताना दिसत असतात. सध्या व्हिडीओमध्ये देखील माकड पावसात बसलेले दिसत आहे. त्याच वेळी एक मुलगी माणुसकी दाखवून त्या माकडाला मदत करण्यासाठी पुढे जाते. परंतु तिची मदत ही धोकादायक ठरते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. 

नेमकं व्हिडीओमध्ये काय? 

व्हिडीओमध्ये एक तरुणी पावसात भिजत असलेल्या माकडाला छत्री देताना दिसत आहे. छत्री देताच ते माकड छत्री घेते पण त्याचवेळी जोरदार हवा सुरु असते. त्यामुळे कड्यावर  बसलेले माकड अचानक हवेत उडायला लागते. त्यामुळे ते खाली असणाऱ्या दरीत जाताना दिसते. हे माकड एखाद्या पॅराशूटसारखे हातात छत्री घेऊन उडून जाते. सध्या या घटनेचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या घटनेनंतर त्या मुलीने तिच्या केलेल्या मदतीवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या या व्हिडीओवर प्रेक्षक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामध्ये एका व्यक्तीने लिहिले की, चांगलं करायला गेली आणि नको तेच घडलं. पण हा व्हिडीओ AIच्या माध्यमातून तयार केला आहे असं म्हटलं जात आहे. 

Read More