Brahmos Missile Unknown Facts: भारताकडे अनेक आधुनिक शस्त्रे आहेत. त्यामुळे शत्रू डोळे वर करून पाहण्याची हिंमत करण्यासही घाबरतो. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवताना पाकिस्तानवर हल्ला केला. ज्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. ब्रह्मोसची नेमकी किंमत किती? त्याची रेंज किती? अशा अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे संपूर्ण जगाला भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची जाणीव झाली. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या ऑपरेशनमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. पण तुम्हाला त्याबद्दलच्या अनेक गोष्टी माहिती नसतील. ब्रह्मोसची सध्याची मारा क्षमता 290 किलोमीटर आहे. तर अॅडव्हान्स वर्जनची मारा करण्याची क्षमता 500 ते 800 किलोमीटर आहे. त्याची स्फोटक क्षमता 200 ते 300 किलोग्रॅम हाय-एक्सप्लोझिव्ह आहे. तसेच हे क्षेपणास्त्र मॅक 2.8 ते 3 (ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त) वेगाने शत्रूंना चकमा देण्यास सक्षम आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलंय. त्याची निर्मिती किंमत 250 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 2135 कोटी रुपये इतकी आहे. ब्रम्होस साकारण्यात भारताचा वाटा 50.5% आणि रशियाचा वाटा 49.5% इतका होता.
ब्रह्मोसच्या उत्पादन युनिटच्या उभारणीसाठी 300 कोटी रुपये खर्च झाले. तसेच त्याच्या एका क्षेपणास्त्राची बाजारभाव किंमत सुमारे 34 कोटी रुपये आहे. ब्रह्मोस व्यतिरिक्त भारताकडे अग्नि, पृथ्वी आणि प्रलय सारखी क्षेपणास्त्रेदेखील आहेत.या क्षेपणास्त्राची अचूकता, वेग आणि शक्ती यामुळे ते भारताच्या सर्वात विश्वासार्ह शस्त्रांच्या यादीत आहे. ते जमीन, हवा आणि समुद्र या तिन्ही माध्यमातून शत्रूला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. त्याची जबाबदारी स्वतःच शत्रूंसाठी एक मोठा धोका बनलीय.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलंय. त्याचे नाव दोन्ही देशांच्या नद्यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय. ज्यामध्ये भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मोस्कवा नदीची नावे वापरली गेली आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.