Viral Video Of Goats: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला बोध मिळतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही काही शेळ्या पाहू शकता. या शेळ्या अत्यंत सावधपणे वाहत्या पाण्यावरून आपली वाट ओलांडताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत एक महिलाही आहे. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशू काब्रा यांनी शेअर केला आहे. तसेच दुसऱ्या स्थान देऊन आपण पुढे जाऊ शकतो, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
ट्रेंडिंग व्हिडीओ पाहून असे दिसते की, या भागात खूप पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. पाण्याचा प्रवाहही खूप वेगवान आहे. अशा परिस्थितीत शेळ्या आळीपाळीने स्लॅबवर चढून मार्ग काढत आहेत. मार्ग काढताना एखादी छोटी चूकही महागात पडू शकते. अंदाज चुकला तर थेट पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याचा धोका आहे. मात्र शेळ्या या संकटावर मात करत एका मागोमाग एक स्लॅबवर उड्या मारत नदी पार करतात.
दूसरों को स्थान देकर ही,
— Dipanshu Kabra (@ipskabra) July 11, 2022
आप आगे बढ़ सकते हैं pic.twitter.com/N0kybVtLrq
हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला असून आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ तीन हजारांहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.