Marathi News> भारत
Advertisement

लॉकडाऊनमध्येही सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल

काय आहेत सोन्या-चांदीचे दर 

लॉकडाऊनमध्येही सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल

मुंबई : कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशात २१ दिवसांच लॉकडाऊन करण्यात आलंय. यामुळे दिल्लीतील सराफा बाजार बंद आहे. सोन्या-चांदीच्या दरात या काळात मोठे बदल झालेल्या पाहायला मिळत आहेत. बुधवारी सुरूवातीच्या काळात बाजारात सोन्या-चांदीचे दरात कमी पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर दरात वाढ पाहायला मिळाली. बुधवारी सोन्याचं दर वाढला असून ४४,८९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. 

सोन्या-चांदीने हा नवा उच्चांक गाठला आहे. चांदीने देखील ४६ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. महत्वाचं म्हणजे या आठवड्याभरात सोन्याच्या दरात ५,६०० रुपयांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे बाजार बंद आहे पण मल्टि कमोडिटी एक्स्चेंज सुरू असल्याने सोन्या-चांदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. 

चीनमधून जगभरात पोहोचलेल्या कोरोनाने संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम केला आहे. गेल्या महिन्याभरात बाजारात अस्थिरता पाहायला मिळत असून दरात कमी-अधिक फरकाने बदल झाले आहेत. सोन्या-चांदीचे दुकाने बंद असली तरीही कमोडिटी मार्केटमध्ये खरेदी विक्री होत आहे. यामुळे दरात बदल पाहायला मिळत आहेत. 

असोसिएशन दररोज सोन्या चांदीचे दर अपडेट करत असतात. इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनने हे दर अपडेट केले आहेत. मागणी वाढत गेल्यामुळे सोन्याचा दर हा ३९ हजारावरून ४४ हजारापर्यंत पोहोचले. तर चांदीचा दर देखील ४० हजारावरून ४६ हजारापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊननंतर सोन्याची दुकाने उघडल्यावर सोन्याचे दर वधारलेले पाहायला मिळणार आहेत. 

Read More