Marathi News> भारत
Advertisement

सोनं आज पुन्हा महाग झाले, ग्राहकांच्या चिंतेत भर; वाचा आजचा 24 कॅरेटचा भाव

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर 

सोनं आज पुन्हा महाग झाले, ग्राहकांच्या चिंतेत भर; वाचा आजचा 24 कॅरेटचा भाव

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आली आहे. आज MCXवर सोनं किंचित महाग झाले आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदी प्रतिकिलो 100291 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आज काय आहेत सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊयात. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि चिन यांच्यातील टॅरिफ दरांमुळं तणाव वाढला आहे. याचाच परिणाम कमोडिटी बाजारात होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 80 डॉलरने उसळून 3400 डॉलरच्या वर पोहोचला आहे. तर चांदी 5 टक्क्यांनी वाढून 35 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. घरगुती बाजारात सोन्याची किंमती वाढून 98,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. चांदी 4,000 रुपयांच्या वाढीसह एक लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल यामुळं आज 24 कॅरेट सोनं 220 रुपयांनी महागलं असून प्रतितोळा 99,060 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोनं 200 रुपयांनी महाग होऊन 90,800 प्रतितोळा आहे. याचसोबतच 18 कॅरेट सोनं 170 रुपयांनी वधारून 74,300 रुपयांवर पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  90,800 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  99 ,060 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  74, 300  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   9,080 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट  9,906 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट   7,430  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   72,640 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   79,248 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    59,440 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 90,800 रुपये
24 कॅरेट- 99 ,060 रुपये
18 कॅरेट-74, 300  रुपये

Read More