Gold Mines in India Madhya Pradesh: जगभरात सोन्याचे दर वाढले आहेत. भारतात सोन्याची किंमत लाखाच्या जवळपास पोहोचली असली तरी त्याची मागणी कमी झालेली नाही. अशातच भारताला लॉटरी लागली आहे. भारतातील एका राज्यात सोन्याचे साठे सपाडले आहेत. या खाणीमध्ये उत्खनन सुरु झाले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे.
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्हा आता केवळ कोळशासाठीच नाही तर सोन्यासाठीही ओळखला जाणार आहे. येथे भूगर्भात सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. खाणींमध्ये उत्खननाचे कामही सुरू झाले आहे. चार सोन्याच्या खाणींचा लिलाव पूर्ण झाला आहे आणि हे ब्लॉक वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहेत.
कंपन्यांनी खाणींमध्ये यंत्रे तैनात करण्यात आली आहेत. आता येथून सोने काढण्याची तयारी जोरात सुरू आहे. ज्या खाणींचा लिलाव करण्यात आला आहे. त्यात चकारिया, सिलफोरी-सिधार, अमिलहवा आणि चुनपुरवा सोन्याचे ब्लॉक समाविष्ट आहेत. ही सर्व ठिकाणे खनिज संपत्तीने समृद्ध आहेत. या ठिकाणी उत्खनन खनिज विभागाच्या देखरेखीखाली केले जात आहे.
प्राथमिक अहवालानुसार, या खाणींमधून मिळणाऱ्या प्रत्येक टन सामग्रीमध्ये 1.02 ते 1.5 ग्रॅम सोने सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु असून अब्जावधी किमतीचे सोने काढले जाणर असल्याची चर्चा रंगली आहे.
सिंगरौली हा भूभाग कोळसा उत्पादन आणि वीज प्रकल्पांमध्ये आधीच देशात आघाडीवर आहे. आता सोन्याच्या शोधामुळे या जिल्ह्याला आता गोल्डन ओळख मिळली आहे.
सोन्याच्या साठ्यामुळे या प्रदेशात मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या खाणींमधून दरवर्षी सुमारे 250 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे मध्य प्रदेश सरकारच्या उत्पन्नात भर पडणार आहे. स्थानिक विकास योजनांनाही चालना मिळणार आहे.आधुनिक यंत्रे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्खनन केले जाणार आहे. कंपन्या शक्य तितके सोने काढण्यासाठी वेगाने काम करत आहेत. यामुळे येथे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत.