Marathi News> भारत
Advertisement

सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, MCX वर नेमकं काय घडलं?

 सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण झाली आहे. 

सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, MCX वर नेमकं काय घडलं?

मुंबई : सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. एकीकडे शेअर बाजारात मोठी घसरण सुरु असल्यानं सोन्याच्या दरात वाढ सुरु होती. जानेवारीपासून सोन्याच्या दरात जवळपास 12 हजारांची वाढ झाल्याचं समोर आलं होतं. अखेर सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचे दर 89796 रुपयांवर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्याचं धोरण स्वीकारल्यानं सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण एमसीएक्स वर पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोन्याचा दर 87785 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. विशेष बाब 2025 मध्ये सोन्याच्या दरात 14 टक्के तेजी पाहायला मिळाली. तर, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. 

सोन्याच्या दरात पुन्हा तेजी येणार?

तज्ज्ञांच्या माहिती नुसार सोन्याच्या दरातील तेजीचं प्रमुख कारण परताव्याची हमी हे आहे. गाझापट्टीत वाढता संघर्ष असल्यानं सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होण्यास मदत झाली. अमेरिकेची बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. अमेरिकन फेड रिझर्व्ह नुसार आर्थिक विकास कमी राहील, यामुळं महागई वाढेल. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळेल. तज्ज्ञांनी सोन्याचे दर घटतील तेव्हा गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 

एसएएस वेल्थ स्ट्रीटच्या संस्थापक सुंगधा सचदेव यांनी गाझा पट्टीतील वाढता संघर्ष आणि अमेरिकेतील मंगीची चिंता, टॅरिफमुळं वाढणारी महागाई यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली.  काही तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीवर अजून दबाव राहू शकतो. या मागं रुपयाचं मजबूत होणं हे देखील आहे. सोन्याच्या किमतीला 88000 रुपयांची लेवल योग्य आहे, असं ते म्हणाले. 

शेअर बाजारात तेजी 

सप्टेंबर 2024 मध्ये सेन्सेक्सनं उच्चांक गाठला होता. त्या उच्चांकानंतर भारतीय शेअर बाजारात अनेकांनी पैसे गुंतवले. मात्र, त्यानंतर सलग गेले सहा महिने बाजारात घसरण सुरु आहे. याचवेळी 17 मार्च ते 21 मार्चला संपलेल्या 5 दिवसांच्या काळात शेअर बाजारात पुन्हा तेजी आली आहे. 

Read More