Marathi News> भारत
Advertisement

आज सोनं झालं स्वस्त, दर घसरले; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. काय आहेत सध्याचे दर

आज सोनं झालं स्वस्त, दर घसरले; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मंगळवारी घट झाल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $ 2,630वर पोहोचले होते. तसंच, MCX (मल्टी कमोडटी एक्सचेंज) वर सोनं 76,300 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होते. तर, MCXवर चांदी 89,300 रुपयांवर स्थिरावली आहे. डॉलर इंडेक्समध्ये पुन्हा एकदा मजबुती आल्याने 108वर पोहोचले आहे. सुट्ट्यांमुळं ट्रेडिंग वॉल्युममध्ये घसरण पाहायला मिळतेय. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज घट झाली आहे. आज सोन्याचे दर 100 रुपयांनी घसरले असून 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 77,350 रुपयांवर स्थिरावले आहे. सोन्याच्या दरात होत असलेली घसरण पाहून ऐन लग्नसराईच्या दिवसांत ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. डिसेंबरपासून लग्नाचा माहौल सुरू झाला आहे. त्यामुळं सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 77,350 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घट झाली असून सोनं 58,010 रुपयांवर पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70,900 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,350 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,010 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,090 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,735 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 801 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,720 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,880 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58,010 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 70,900 रुपये
24 कॅरेट  77,350 रुपये
18 कॅरेट- 58,010 रुपये

Read More