Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोनं-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज मात्र सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतंय. MCXवर सोनं 760 रुपयांनी घसरले असून 1,02,280वर पोहोचले आहे. सोनं स्वस्त झाल्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
मागील आठवड्यात सोनं आणि चांदी या दोघांच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. सोन्याच्या दरात 2,600 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 5 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली होती. आज चांदीच्या दरात 799 रुपयांनी घसरून 114082वर व्यवहार करताना दिसत आहे.
24 कॅरेट सोन्याच्या दरात 760 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 1,02,280 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 93,750 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 570 रुपयांनी घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 76,710 रुपयांवर स्थिरावले आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट 93,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,280 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,710 रुपये
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,375 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,228 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,671 रुपये
8 ग्रॅम 22 कॅरेट 75,000 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81,824 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 61,368 रुपये
22 कॅरेट- 93,750 रुपये
24 कॅरेट- 1,02,280 रुपये
18 कॅरेट- 76,710 रुपये
-24 कॅरेट: 99.9% शुद्ध सोने, गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
-22 कॅरेट: 91.6% शुद्ध सोने, दागिन्यांसाठी वापरले जाते (8.4% इतर धातू मिसळलेले).
-18 कॅरेट: 75% शुद्ध सोने, अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरले जाते (25% इतर धातू).
- सोन्याची शुद्धता तपासा (हॉलमार्क किंवा स्टॅम्प).
-विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.
-मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.
-खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.
सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.