Marathi News> भारत
Advertisement

Gold Price Today : सोन्याला उसळी, जाणून घ्या आजचे विक्रमी दर

सोन्याच्या दरात मोठा बदल 

Gold Price Today : सोन्याला उसळी, जाणून घ्या आजचे विक्रमी दर

मुंबई : गेल्या दोन तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी म्हणजे 11 नोव्हेंबर 2021 सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर, सकाळी 9.30 वाजता, सोन्याचा भाव 156 रुपयांनी किंवा 0.32% ने वाढला आणि त्याची किंमत 49,010 रुपये प्रति ग्रॅम नोंदवली गेली. मागील सत्रात सोने 48,854 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. त्याच वेळी चांदीचा भाव 102 रुपयांनी किंवा 0.15 टक्क्यांनी वधारला आणि चांदीचा धातू प्रति किलो 65,980 रुपये झाला. चांदीचा भाव 65,878 रुपयांवर बंद झाला.

आज आंतरराष्ट्रीय बाजारातही किमतीत वाढ दिसून येत आहे. जर तुम्ही GoldPrice.org वर बघितले तर, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेळेनुसार सकाळी 09.36 वाजता MCX वर सोने 1.04 टक्क्यांनी वधारत होते आणि धातू 1,848.66 रुपये प्रति ग्रॅम पातळीवर व्यवहार करत होते. त्याचवेळी चांदीचा भाव 1.71 टक्क्यांनी वाढून 24.72 रुपये प्रतिकिलो झाला.

स्थानिक बाजारात काय होता सोन्याचा दर 

रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 137 रुपयांनी वाढून 47,311 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यामुळे मागील व्यवहारात सोने 47,174 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. मात्र, चांदीचा भाव 160 रुपयांनी घसरून 63,482 रुपये प्रतिकिलो झाला. मागील व्यवहारात चांदीचा भाव 63,642 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

गुड रिटर्न्स वेबसाइटवर पाहिल्यास, आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 ग्रॅमसाठी 4,826 रुपये, 8 ग्रॅमसाठी 38,608, 10 ग्रॅमसाठी 48,260 आणि 100 ग्रॅमसाठी 4,82,600 रुपये आहे. 10 ग्रॅमवर ​​नजर टाकली तर 22 कॅरेट सोने 47,260 ला विकले जात आहे. 

प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमतींवर नजर

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,360 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,710 वर चालू आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,260 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,260 वर आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोने 47,660 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोने 50,360 रुपये आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,460 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,590 रुपये आहे. या किंमती प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या आहेत

चांदीचा दर 

जर आपण चांदीबद्दल बोललो, तर वेबसाइटनुसार, प्रति किलो चांदीची किंमत 65,900 रुपये प्रति किलो आहे. दिल्लीत चांदी 65,900 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मुंबई आणि कोलकात्यातही चांदीचा भाव सारखाच आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत 69,300 रुपये प्रति किलो आहे. 

 

 

 

 

Read More