Gold Price Today 26 March on MCX : आज शेअर बाजाराबरोबरच सराफा बाजारातही सुस्ती दिसत आहे. MCXवर सोनं 69 रुपयांनी कमी होऊन 87,485 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करतंय. तर, चांदीची चमकही आज काहीशा कमी झाली आहे. चांदी 53 रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन 99,100 रुपयांवर ट्रेड करतेय. मंगळवारी मात्र सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. काय आहेत आज सोन्याचे दर जाणून घेऊयात.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याच्या किंमती आज स्वस्त झाल्या आहेत. सोन्याचा वायदा 60 रुपयांनी घसरला असून आज 10 ग्रॅम सोनं 87,500 रुपयांवर स्थिरावले आहे. सोन्याने उच्चांकी दर गाठल्यानंतर दर आज 1.5 टक्क्यांने घसरले आहे.
लग्नसराईचे दिवस सुरू झाल्यानंतर सोन्याच्या दरात थोडी घट झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिओ-पॉलिटिकल टेन्शन आणि आर्थिक अनिश्चितता यामुळं सोन्याच्या मागणीत वाढ होताना दिसते. डॉलरच्या कमजोरीमुळं गुंतवणुकदार सोन्यात सुरक्षित गुंतवणुक करताना दिसत आहेत. अमेरिकेत वाढत्या चिंतेमुळं गुंतवणुकदार सोन्याचा पर्याय स्वीकारत आहेत
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर $3,050 रुपयांवर ट्रेड करत होते. तर चांदी 2.5 टक्क्यांनी उसळी घेऊन $ 34 वर पोहोचली आहे. भारतात सराफा बाजारात आज सोनं 300 रुपयांच्या तेजीने 87,600 रुपयांवर स्थिरावले आहे तर चांदी 1,600 रुपयांनी वाढून 97,600 रुपयांवर स्थिरावली आहे. कच्च्या तेलाची किंमत $ 72 वर स्थिरावली आहे.