Gold Rate Today: टॅरिफबाबत अमेरिकेचे राष्ट्र्रपती डोनाल्ड ट्रंप यांचा निर्णय आला आहे. भारतावर लादण्यात आलेला 25 टक्के टॅरिफ वाढवून 50 टक्के करण्यात आला आहे. टॅरिफ दर आणि ड़ॉलरची कमजोरी यामुळं सोनं-चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. घरगुती वायदे बाजारातदेखील सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात किती वाढ झालीये हे जाणून घेऊयात.
गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली आहे. कारण गुंतवणुकदारांनी सुरक्षित गुंतवणुक म्हणून पुन्हा एकदा सोन्याचा पर्याय स्वीकारला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळं जागतिक व्यापारात तणाव वाढला आहे.
स्पॉट गोल्डची किंमत 0.4 टक्क्यांनी वाढून $3,380.76 प्रति औंसवर पोहोचली आहे. तर अमेरिका गोल्ड फ्युचर्स 0.3 टक्क्यांच्या तेजीने $ 3,443.30 वर ट्रेड करताना दिसतोय. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्पकडून सातत्याने टॅरिफबाबत इशारा देण्यात येत आहे. त्यामुळं मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ होत आहे.
सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाखांच्या पार गेली आहे. चांदीची किंमतीत 1000 रुपयांहून अधिक तेजी आली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपयांची वाढ झाली असून 1,02,550 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 94,000 हजारांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची वाढ झाली असून 76,910 रुपयांवर पोहोचलं आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट 94,000 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,550 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,910 रुपये
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,400 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,225 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,691 रुपये
8 ग्रॅम 22 कॅरेट 75,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 82,040 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 61,528 रुपये
22 कॅरेट- 94,000 रुपये
24 कॅरेट- 1,02,550 रुपये
18 कॅरेट- 76,910 रुपये