Marathi News> भारत
Advertisement

ऐन सणासुदीच्या काळात सोनं-चांदी महागलं, 10 ग्रॅम दागिन्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे

Gold Price Today: ऐन सणासुदीच्या दिवसात सोनं चांदी महागलं असून वाढत्या दरामुळं सोने, चांदी घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर.

ऐन सणासुदीच्या काळात सोनं-चांदी महागलं, 10 ग्रॅम दागिन्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे

Gold Price Today: जागतिक घडामोडींमुळं कमोडिटी मार्केटमध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. MCX वर सोनं आज महागलं आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली असून सोनं पुन्हा एक लाखांच्या पार गेले आहे. तर चांदीच्या दरातही 1 हजारांची वाढ झाली असून चांदीचे दर 1 लाख 13 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. 

अमेरिकन टॅरिफचे सावट असल्याने सोनं-चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 0.5 टक्के आणि चांदी 1 टक्क्याने वाढली आहे. स्टकिस्टने अलीकडेच केलेल्या खरेदीदारीमुळं सोमवारी सोन्याचे दर वाढले होते. तर आज टॅरिफ दर आणि त्या घडामोडी यामुळंदेखील सोन्याच्या दरात वाढ होताना दिसतेय. आज जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव जीएसटी सहित 1 एक लाख 3 हजार 500 रुपये आणि चांदी जीएसटी सहित 1 एक लाख 16 हजार 300 रुपयापर्यंत पोहोचले आहे

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,02,220 रुपयांवर पोहोचले आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 93,700 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 620 रुपयांची वाढ झाली असून 76,670 रुपये प्रतितोळावर पोहोचले आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 93,700 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,220 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,670 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,370 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,222 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,667 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 74,960 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81,776 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 61,336 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 93,700 रुपये
24 कॅरेट- 1,02,220 रुपये
18 कॅरेट- 76,670 रुपये

Read More