Marathi News> भारत
Advertisement

Gold Rate today | मोठ्या घसरणीनंतर सोन्याचे दर स्थिर; तर चांदीच्या दरांत काहीशी वाढ

तुम्ही सोने खरेदी करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी सध्या चांगली संधी आहे. कारण सोने सध्या आपल्या उच्चांकी दरांपेक्षा 7500 ते 8000 रुपये प्रति तोळ्यांनी स्वस्त मिळत आहे. 

Gold Rate today | मोठ्या घसरणीनंतर सोन्याचे दर स्थिर; तर चांदीच्या दरांत काहीशी वाढ

मुंबई : तुम्ही सोने खरेदी करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी सध्या चांगली संधी आहे. कारण सोने सध्या आपल्या उच्चांकी दरांपेक्षा 7500 ते 8000 रुपये प्रति तोळ्यांनी स्वस्त मिळत आहे. पुन्हा एकदा लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे. 

कोरोना संसर्गामुळे सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असली तरी, सोन्याच्या दरांमध्ये अनेक दिवसांपासून होत असलेली घसरण आजही दिसून आली. तसेच चांदीच्याही किंमतीत घसरण नोंदवली गेली. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची किंमत 47 हजार 548 रुपये प्रति तोळे इतकी होती. तर चांदीच किंमत 60 हजार 779 रुपये प्रति तोळे इतकी ट्रेड करीत होती.

मुंबईतील सोन्याचे दर

11 जानेवारी  48,590 रुपये प्रति तोळे 
10 जानेवारी 48,610 रुपये प्रति तोळे
09 जानेवारी 48,610 रुपये प्रति तोळे
08 जानेवारी 48,600 रुपये प्रति तोळे
07 जानेवारी 48,510 रुपये प्रति तोळे

मुंबईतील चांदीचे दर
 
 11 जानेवारी 60800  रुपये प्रति किलो
10 जानेवारी 60400 रुपये प्रति किलो
09 जानेवारी 60700 रुपये प्रति किलो
08 जानेवारी  60700 रुपये प्रति किलो
07 जानेवारी  60400 रुपये प्रति किलो
 
 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 

24 कॅरेट सोने आलिशान असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read More