Gold Rate Today: या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. सोन्याच्या दर गगनाला भिडले असून भाव लाखांच्या पार गेले आहेत. आज मात्र ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील दर घसरले आहेत. वायदे बाजारात देखील घसरण झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी MCXवर सोनं 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीचे दर देखील उतरले आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.
या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दराने एक लाखांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात सतत वाढ होत होती. पण आज मात्र सोन्याचे दर किंचितशे घसरले आहेत. या दरम्यान चांदी 1577 रुपयांनी घसरली असून 1,05,816 रुपयांवर ट्रेड करत आहे. काल चांदी 1,07,393 रुपयांवर स्थिरावली होती. त्यामुळं या आठवड्यात चांदी 4,067 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याचे दर घसरले आहेत. अमिरेकन डॉलर मजबूत झाल्याने फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याज दराक कपात करू शकता. स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी घसरून 3.355.49 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. अमेरिकेत गोल्ड फ्युचर्सच्या किंमतीत 1 टक्क्यांची घट होऊन 3.371.80 डॉलरच्या आसपास पोहोचली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा भाव 1,00,480 रुपयांवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची घट झाली असून 92,100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 75360 रुपयांवर पोहोचले आहेत.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 92,100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,00 ,480 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 75,360 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 10,048 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9, 210 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7, 536 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 80,384 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 73,680 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60,288 रुपये
22 कॅरेट- 92,100 रुपये
24 कॅरेट- 1,00 ,480 रुपये
18 कॅरेट- 75,360 रुपये