Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. वायदे बाजारात चांदीमध्येदेखील तेजी आली आहे. काल अमेरिकेच्या 10 वर्षांच्या बॉन्ड यील्डमध्ये तेजी आल्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी पाहायला मिळाली होती. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी तेजी आली होती. डॉलर कमकुवत झाल्यामुळं सोनं 40 डॉलर उसळून 3325वर पोहोचला आहे. तर चांदी दीड टक्क्याने उसळून 33 डॉलरवर स्थिरावली आहे.
सोन्याच्या किंमतीत आलेल्या उसळीनंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. यामुळं डॉलर सातत्याने कमकुवत होताना दिसत आहे. तर यामुळं सोन्याच्या किंमतीत उसळी आली आहे. मागील आठवड्यात वाढत्या कर्जामुळं आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मुडीकडून USला डाउनग्रेड केले होते.
आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 21 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची वाढ झाली आहे. तसंच, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रुपयांची वाढ झाली आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 89,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 97,910 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 73,440 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,791रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,975 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,344 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 78,328 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 71,800 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58,752रुपये
22 कॅरेट- 89,750 रुपये
24 कॅरेट- 97,910 रुपये
18 कॅरेट-73,440 रुपये