Marathi News> भारत
Advertisement

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करायचंय? उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किती घसरण झालीये, जाणून घ्या

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करायचंय? उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे भाव

Gold Price Today: अमेरिका आणि चीन यांच्यात बऱ्याच कालावधीपासून टॅरिफ वॉर सुरू आहे. त्याचाच परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. काहि दिवसांपूर्वी सोन्याचे दर 1 लाखांवर गेले होते. मात्र आज सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज MCX वर सोनं 1355 रुपयांनी घसरले आहे. त्याचबरोबर प्रतितोळा सोनं 95,985 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. तर एकीकडे चांदीच्या दरात 212 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदी प्रतिकिलो 95667 वर व्यवहार करत आहे. 

मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने प्रतितोळा सोनं 1 लाखांवर पोहोचलं होतं. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं महाग झालं होतं. मात्र आज सोन्याचे दर घसरले आहेत. बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांना पदावरून हटवण्याची धमकी मागे घेतल्यानंतर चीनसोबतच्या व्यापाराबाबत सकारात्मक भूमिका होऊ शकते अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. सोनं 0.7 टक्क्यांनी घटून 3,357.11 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. अमेरिकेने सोन्याचा वायदा 1.5 टक्क्यांनी कमी होऊन 3,366.80 डॉलरवर पोहोचले आहेत. 

आज 24 कॅरेट सोन्याचे दर 3,000 रुपयांनी घरून 98,350 रुपयांवर स्थिरावले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 2,750 रुपयांनी घसरून 90,150 रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 2,250 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा 73,760 रुपयांववर पोहोचले आहेत. 

काय आहेत सोन्याचे दर!
ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  90,150 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 98,350 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  73,760 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट  9,015 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9,835 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    7,376 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   72,120 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   78,680 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    59,008  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 90,150 रुपये
24 कॅरेट- 98,350 रुपये
18 कॅरेट- 73,760 रुपये

Read More