Marathi News> भारत
Advertisement

1 लाखांपार पोहोचलेल्या सोन्याचे दर घसरणीला; अक्षय्य तृतीयेआधी सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दर

Gold Price Today: सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली होती मात्र आता सोन्याचे दर घसरले आहेत. 

1 लाखांपार पोहोचलेल्या सोन्याचे दर घसरणीला; अक्षय्य तृतीयेआधी सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दर

Gold Price Today: सोन्याचे दर एक लाखांपर्यंत गेले होते. त्यानंतर मात्र आता सोन्याचे दर उतरणीला लागले होते. मंगळवारी 22 एप्रिल रोजी सोनं 1 लाखांवर गेले होते. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनं घसरलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 90,000 रुपये आणि 24 कॅरेट 10ग्रॅम सोन्याचा दर 98,200 रुपयांवर व्यवहार करत आहे. चांदी 1 लाख रुपयांवर ट्रेड करत आहे. आज गुरुवारी 24 एप्रिल 2025 रोजी सोनं-चांदीचे दर काय आहेत, जाणून घ्या. 

गुरुवारी 24 एप्रिल 2025 रोजी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर 1,00,900 रुपयांवर व्यवहार करत आहेत. बुधवारच्या तुलनेत चांदी आज 200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 90,050 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 98,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. 

अमेरिका आणि चीन यांच्यात वाढत जाणाऱ्या व्यापारी तणाव आणि टॅक्साबाबत धोरणं यामुळं सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं पुन्हा एकदा महाग झाले आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे.  तज्ज्ञांच्या मते, पुढील ६ महिन्यात सोन्याचे दर साधारण 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होऊ शकतात. मात्र जर अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले तर त्याचा परिणाम मौल्यवान धातुवर होऊ शकतो. त्यामुळं सोन्याची किंमत 1,38,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. 

काय आहेत सोन्याचे दर!

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  90,050 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 98,240 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  73,680 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट  9,005 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9,824 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    7,368 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट  72,040 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट  78,592 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट   58,944  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 90,050 रुपये
24 कॅरेट- 98,240 रुपये
18 कॅरेट- 73,680 रुपये

Read More