Marathi News> भारत
Advertisement

डोनाल्ड ट्रंप यांच्या 'त्या' घोषणेमुळं सोनं वधारलं? आज सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, वाचा आजचा भाव


Gold Price on Record High: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उच्चांकी वाढ झाली आहे. 

डोनाल्ड ट्रंप यांच्या 'त्या' घोषणेमुळं सोनं वधारलं? आज सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, वाचा आजचा भाव

Gold Price on Record High: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. त्याचबरोबर सोन्याच्या दरा आज उच्चांक दरवाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. आज मौल्यवान धातुच्या किंमतीत उच्चांकी दरवाढ झाली आहे. आज MCX वर सोन्याचा वायदा 91,423 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $3,200 रुपयांच्या स्तरावर पोहोचलं आहे. MCX वर सोन्याने 18 टक्के परतावा दिला आहे. तर, 1 महिन्यात सोनं 5 टक्क्यांनी उसळलं आहे. 

चांदीच्या दरात घट 

ट्रंप यांनी येत्या काळात सर्व देशांवर टॅरिफ लावणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केलीय.  त्यांनी भारतालाही जोरदार धक्का दिलाय. भारतावर 26 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केलीय. अमेरिकी बॉन्ड यील्डमध्ये घट झाली आहे. तर डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी आली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 1 आठवड्यात चांदीचे भाव कोसळले आहेत. घरगुती बाजारात 1 टक्क्यांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. MCXवर भाव पुन्हा 1 लाखापर्यंत पोहोचला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये भाव 2 टक्क्यांनी अधिक घसरला आहे. कॉमेक्स सिल्व्हर $34 पर्यंत घसरला आहे. 

सकाळी 10.15 च्या आसपास 24 कॅरेट सोन्याचे दर 540 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचे दर 93,530 रुपयांवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 500 रुपयांनी वाढले असून 10 ग्रॅम सोन्याचा दर 85,750 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचा दर 410 रुपयांनी वधारला असून 70,160 रुपयांवर पोहोचला आहे. 

काय आहेत सोन्याचे दर?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  85,750 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 93,530 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  70,160 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,575 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9, 353 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    7, 016 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   68,600 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   74,824 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    56,128 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-85,750 रुपये
24 कॅरेट- 93,530 रुपये
18 कॅरेट- 70,160 रुपये

Read More