Marathi News> भारत
Advertisement

निच्चांकी घसरणीनंतर आज पुन्हा सोनं झालं महाग; वाचा 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उच्चांकी वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर

निच्चांकी घसरणीनंतर आज पुन्हा सोनं झालं महाग; वाचा 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर

Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली होती. मात्र आता ही घसरण थांबली आहे. आज सोन्याला पुन्हा एकदा झळाळी आली आहे. सोन्याच्या दरांनी आज पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही किंचित वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामागे अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ वॉर आहे. आज सोन्याचे दर काय आहेत जाणून घेऊयात. 

मंगळवारी अमेरिकेतील सोन्याच्या किमतीत घट झाली होती.  कारण यू.एस ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाली, तर डॉलर  कमकुवत झाल्यामुळं आणि जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील वाढत्या व्यापार युद्धामुळे किमती कमी राहिल्या. सेशनच्या सुरुवातीला 1.3 टक्क्यांची वाढ झाली होती. स्पॉट गोल्ड 0.1% वाढून $2,984.16 प्रति औंस झाले. अमेरिकन सोन्याचे वायदे  0.5% वाढून $ 2,990.20 वर पोहोचले.

आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 650 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याची 82,900 रुपयांवर येऊन पोहोचली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 710 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 90,440 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ झाली असून 67,830 रुपयांवर सोन्याचे दर प्रति तोळा पोहोचले आहेत. 

काय आहेत सोन्याचे दर?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  83,050 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 90,590 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  67,950 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,305 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9, 059 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 795 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   66,440 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   72,472 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    54,360 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 83,050 रुपये
24 कॅरेट- 90,590 रुपये
18 कॅरेट- 67,950 रुपये

Read More