Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. सोनं एक लाखांच्या पार गेलं होतं. मात्र आता सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. MCX वर सोन्याच्या दरात घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका-ईयू ट्रेड डीलच्या अपेक्षेमुळं सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली आहे. अमेरिका आणि युरोपीय यूनियन (EU) दरम्यान 15 टक्के टॅरिफ डीलजवळपास पोहोचल्यामुळं सुरक्षित गुंतवणीची मागणी कमजोर होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या किंमतीत मोठी उसळी असल्याचे पाहायला मिळतेय. आज सोनं 24 कॅरेट 1360 रुपयांनी घसरले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. स्पॉट गोल्ड 1.3 टक्क्याने घसरून $3,387.67 प्रति औंसवर पोहोचले आहे. यूएस गोल्ड फ्युचर्सदेखील 1.4 टक्क्यांची घसरणीनंतर $3,396.9 वर स्थिरावले होते. मार्केट एक्सपर्टनुसार, अमेरिका आणि जपान यांच्यात झालेल्या डीलमुळं गुंतवणुकदार जोखीम पत्करत आहेत. त्यामुळं सोन्याच्या दरात घट होत आहे. भारतीय बाजारपेठेत 24 कॅरेट सोन्याचे दर एक लाखांच्या पार पोहोचले आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,360 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं ₹1,00,970 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1250 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 92,550 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,020 रुपयांची घट झाली असून 75,730 रुपयांवर पोहोचले आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट 92,550 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,00,970 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,730 रुपये
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,255 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,097 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,573 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 74,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 80,776 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60,584 रुपये
22 कॅरेट- 92,550 रुपये
24 कॅरेट- 1,00,970 रुपये
18 कॅरेट- 76,730 रुपये