Marathi News> भारत
Advertisement

एका आठवड्यात 700 रुपयांनी महागलं सोनं, 24 कॅरेट सोन्याचे दर काय? जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज सोनं किती रुपयांनी वधारलं जाणून घेऊयात

एका आठवड्यात 700 रुपयांनी महागलं सोनं, 24 कॅरेट सोन्याचे दर काय? जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत मागील आठवड्यात सलग तीन दिवस घसरण झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वधारले आहेत. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातुत तेजी असल्याचे दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं 100 रुपयांच्या तेजीने लाख रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी 155 रुपयांनी वाढून 1,13,105 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मागील सत्रात चांदी 1.12,950 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली होती. सोनं-चांदीच्या रिटेल दरातदेखील जबरदस्त तेजी आली आहे. गेल्या एक आठवड्यात 700 रुपयांनी सोनं महाग झालं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत कमी बदल झाल्याचे पाहायला मिळालेत. कारण गुंतवणुकदार अमेरिकेच्या उद्योग जगतात होणाऱ्या घटनाक्रमावर बारीक नजर ठेवून आहेत. या आठवड्यात होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत संभाव्य बाजार-चालित उत्प्रेरकांची देखील वाट पाहत आहे. पहाटे 02.50 वाजता, स्पॉट गोल्ड प्रति औंस $3.359.19 वर स्थिर होते, तर यूएस गोल्ड फ्युचर्स देखील $3,358.70 वर स्थिर होते.

तज्ज्ञांच्या मते, आठवड्याच्या सुरुवातीलाच डॉलर कमकुवत झाला आहे. ज्यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. अशा वेळी टॅरिफ दरांमुळं अनिश्चितता आहे. त्यामुळं सोन्यातडे सुरक्षित गुंतवणुक म्हणून पाहिले जात आहे. सोनं आणि चांदी दोन्ही रिटेल किंमत या आठवड्यात वाढताना दिसत आहे. सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात 700 रुपयांनी अधिक वाढ झाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 11 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,00,150 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 91,800 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 80 रुपयांची वाढ झाली असून 75,110 रुपयांवर पोहोचलं आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 91,800 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,00,150 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 73,440 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,108 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 10, 015 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,511 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 73,440 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 80,120 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 60,088 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 91,800 रुपये

24 कॅरेट- 1,00,150 रुपये

18 कॅरेट- 73,440 रुपये

Read More