Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर आज मात्र सोन्याने मोठी उसळी घेत एक लाखांचा टप्पा पार केला आहे. स्पॉट मार्केट आणि डॉलरमध्ये आलेली स्थिरता यामुळं चांदीनेही उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं लाखाच्या वर पोहोचलं आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंपने जपानसोबत एका नव्या ट्रेड डीलची घोषणा केली आहे. ज्यामुळं सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. या डीलमुळं जपानमधून अमेरिकेत इंपोर्ट होणार्या सामानावर 15 टक्के टॅरिफ लावले जाणार आहेत. यानंतर गुंतवणुकदारांमध्ये सतर्कता पाहायला मिळतेय. ज्यामुळं सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. आज चांदीच्या दरात 0.49 टक्क्यांच्यी वाढ होऊन प्रति किलोग्रॅम 1,16,216 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. चांदीने हा नवा उच्चांक गाठला आहे.
चांदीच्या किंमती वाढल्याचे मुख्य कारण म्हणजे डोमेस्टिक स्पॉट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी आणि डॉलरमध्ये स्थिरता. या व्यतिरिक्त चांदीची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली आहे. त्यामुळं चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट 93,800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,330 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,750 रुपये
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,380 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10, 233 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,675 रुपये
8 ग्रॅम 22 कॅरेट 75,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81,864 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 61,400 रुपये
22 कॅरेट- 93,800 रुपये
24 कॅरेट- 1,02,330 रुपये
18 कॅरेट- 76,750 रुपये