Marathi News> भारत
Advertisement

गणेशोत्सवापूर्वी सोन्याची चमक वाढली; आज पुन्हा महागले सोनं, वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून आज काय आहेत सोन्याच्या दर जाणून घ्या. 

गणेशोत्सवापूर्वी सोन्याची चमक वाढली; आज पुन्हा महागले सोनं, वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आल्याचे पाहायला मिळतेय. चांदीच्या दरात 720 रुपयांनी मजबूत होऊन 110978 रुपये प्रति किलोवर ट्रेड करताना दिसतोय. चांदीदेखील 720 रुपयांनी महागली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याच्या दरात तेजी आली आहे. सोनं 50 डॉलरने उसळून 3,400 डॉलरच्या वर पोहोचले आहे. तर चांदी 37 डॉलरच्या जवळपास आहे. 

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली होती. तर 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत गुरुवारच्या तुलनेत 281 रुपयांची किरकोळ घट झाली होती. चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली होती. मात्र आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

आज 24 कॅरेटच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली असून सोनं पुन्हा 1,01,400 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरातही 50 रुपयांची वाढ झाली असून 92,950 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 40 रुपयांची वाढ झाली असून 76,050 रुपयांवर पोहोचले आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 92,950 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,01,400 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,050 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,295 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,140 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,605 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 74,360 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81,120 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60,840 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 92,950 रुपये
24 कॅरेट- 1,01,400 रुपये
18 कॅरेट- 76,050 रुपये

Read More