Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी आल्याचे दिसून आले आहे. सोनं पुन्हा एकदा MCX वर 600 रुपयांनी वाढले असून एक लाखांच्या पार गेले आहे. अमेरिकेकडून रशियाला देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे पाहायला मिळतेय. ब्रेंट क्रूड जवळपास 3 टक्क्यांनी वाढून 72 डॉलरच्या जवळपास पोहोचले आहे. तर, देशांतर्गंत बाजारात सोनं 660 रुपयांनी वाढून एक लाखांच्या पार पोहोचले आहे. तर चांदी 750 रुपयांच्या तेजीसह 1,13,800 रुपयांवर स्थिरावली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 1,00,480 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 92,100 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोनं 490 रुपयांनी महागले असून 75,360 रुपयांवर पोहोचली आहे.
चांदीच्या दरात 323 रुपयांची वाढ नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर चांदीची किंमत 1,1307 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. आधी चांदीची किंमत 1,12,984 रुपये प्रति किलो इतकी होती. वायदा बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 5 ऑगस्ट 2025 च्या सोन्याच्या वायद्याची किंमत 0.27 टक्क्यांनी वाढून 97,804 रुपये झाली आणि 5 सप्टेंबर 2025 च्या चांदीच्या कराराची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,13,289 रुपये झाली.
10 ग्रॅम 22 कॅरेट 92,100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,00,480 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 75,360 रुपये
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,210 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,384 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,536 रुपये
8 ग्रॅम 22 कॅरेट 73,680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 80,384 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60,288 रुपये
22 कॅरेट- 92,100 रुपये
24 कॅरेट- 1,00,480 रुपये
18 कॅरेट- 75,360 रुपये