Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा सुस्ती आल्याचे पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. देशांतर्गंत बाजारात सोनं घसरले असून चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. MCX वर सोनं 96,000 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. कॉमेक्सवर सोन्याचा भाव $ 3,300 वर नोंदवला आहे. आता सोनं MCX वर रेकॉर्डब्रेक उच्चांकापासून तीन हजारांच्या खाली आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ऑल टाइम हायपासून $200 रुपये दूर आहे.
US-UK डीलमुळं किमतींवर दबाव पडत आहे. चीनसोबत लवकरच व्यापार समजूतीची अपेक्षा केली जात आहे. डॉलर इंडेक्स मजबूत झाल्यामुळं सोन्याच्या दरांवर दबाव पडला आहे. तर, चांदीच्या दरातही सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. घरगुती बाजारात 200हून जास्त अंकानी घसरण झाली आहे. MCXवर सोनं 96, 000 हजारांपर्यंत स्थिरावले आहे. कॉमेक्सवर $32 च्या जवळपास पोहोचले आहे. तर देशांतर्गंत बाजारात 6 महिन्यात 8 टक्क्यांपर्यंत चढले आहेत. या वर्षी चांदी 13 टक्क्यांनी महागली असून USच्या स्पॉट मार्केटमध्येदेखील भाव $ 32च्या जवळपास पोहोचला आहे.
MCX वर आज सकाळी 11 च्या सुमारास सोनं 1,250 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचे दर 98,350 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,150 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 90,150 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 940 रुपयांनी कमी झालं असून प्रतितोळा सोनं 73,760 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 90,150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 98,350 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 73,760 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,015 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,835 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,376 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 72,120 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 78,680 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59,008 रुपये
22 कॅरेट- 90,150 रुपये
24 कॅरेट- 98,350 रुपये
18 कॅरेट- 73,760 रुपये